सत्यराज स्पोर्ट्स अकॅडमी वाघेरी क्रीडा महोत्सव आयोजित जिल्हास्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धेत यंगस्टार कणकवली विजेता

तर लक्ष्मीनारायण वालावल संघ उपविजेता

जिल्ह्यातील २० संघांनी घेतला स्पर्धेत सहभाग

फोंडा । प्रतिनिधी : फोंडा घाट येते सत्यराज स्पोर्ट्स अकॅडमी वाघेरी क्रीडा महोत्सव आयोजित जिल्हास्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत जिल्ह्यातील वीस नामवंत संघाने सहभाग घेतला या स्पर्धेतील अंतिम सामना लक्ष्मीनारायण वालावल विरुद्ध यंगस्टार कणकवली या दोन संघादरम्यान झाला यात यंगस्टार संघाने लक्ष्मीनारायण वालावल संघावर मात करत प्रथम क्रमांक पटकावला या कणकवली संघाला रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले तर द्वितीय क्रमांक लक्ष्मीनारायण वालावल संघाला रोख रक्कम व चषक देऊन गौरवण्यात आले. तृतीय क्रमांक नडगिवे फोंडा तर चतुर्थ क्रमांक जय महाराष्ट्र सावंतवाडी संघाला सुद्धा गौरविण्यात आले उत्कृष्ट चढाई म्हणून सुमित गावडे उत्कृष्ट पकड गुरु पाटकर यांना गौरविण्यात आले.

स्पर्धेचे बक्षीस वितरण श्री मनोज रावराणे पंचायत समिती सभापती कणकवली भाजपा यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत सिंधुदुर्ग कबड्डी ऑफिशियल यांनी पंच म्हणून काम केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी संघटना खेळाडूंनी यापुढेही अशाच प्रकारच्या स्पर्धा भरवल्या जातील व येत्या नजीकच्या काळात कुडाळ कणकवली सावंतवाडी या ठिकाणी चार मोठ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.