रत्नागिरीच्या माईंडकेअर हॉस्पिटलचा दिल्ली मध्ये झेंडा !

रत्नागिरीच्या माईंडकेअर हॉस्पिटल ला दिल्ली मध्ये पुरस्कार!

रत्नागिरी: रत्नागिरीच्या माईंडकेअर हॉस्पिटल चा झेंडा दिल्ली मध्ये फडकला आहे. नवी दिल्ली येथे दिनांक 22 सप्टेंबर रोजी Emerging SME award – Healthcare हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. सदर पुरस्कार सोहळा नवी दिल्ली येथे दिनांक 22 रोजी हॉटेल वेलकम बाय आय टी सी हॉटेल्स, द्वारका येथे सक्षम समीट या कार्यक्रमात घेण्यात आला होता. तो सी ए आय टी चे राष्ट्रीय महामंत्री श्री प्राविण खंडेलवाल यांच्या हस्ते डॉ अतुल ढगे यांना प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कारासाठी भारतातून आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्थांनी व हॉस्पिटलनी नामांकन दिले होते. माईंड केअर हॉस्पिटल ने आतापर्यंत केलेल्या मानसिक व लैंगिक आरोग्य क्षेत्रात केलेल्या कामाबद्धल व दिलेल्या योगदानाबद्धल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

माईंड केअर हॉस्पिटल ची सुरुवात डॉ अतुल ढगे यांनी 2013 मध्ये एका छोट्या क्लिनिक पासून केली होती. मुंबई पुण्यासारख्या शहरासोबतच ऑस्ट्रेलिया, इंग्लंड मालदीव अश्या ठिकाणाहून ऑफर असताना रत्नागिरी सारख्या छोट्या शहरात सेवा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कोकणातल्या अंधश्रध्देच्या वातावरणामुळे रुग्णांना खूप त्रास सहन करावा लागतो त्यामुळे इथे जनजागृती करून रुग्णांना सेवा मिळवून देणे व त्यांची या त्रासातून सुटका करणे त्यांना आव्हानात्मक वाटले. मागील 10 वर्षात त्यांनी अविरतपणे रत्नागिरी जिल्ह्यात काम केले आहे. रुग्णांना योग्य व उत्तम सुविधा देण्यासोबतच त्यांनी मानसिक आजाराविषयी व लैंगिक आरोग्याविषयी व व्यसनमुक्ती विषयी सर्व सामन्यात, जनमाणसांत जनजागृती केली आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शालेय प्रगतीसाठी, व्यक्तींसाठी व्यक्तिमत्त्व विकासासाठी ते व्यसनमुक्तीसाठी, विविध गटासाठी वेगवेगळे कार्यक्रम ते घेत असतात. प्रत्यक्ष कार्यक्रमासोबतच तंत्रज्ञानाची मदत घेऊन, जास्तीत जास्त लोकांमध्येही जनजागृती व्हावी म्हणून या सर्वासाठी ते फेसबुक, व्हॉट्सॲप, यूट्यूबचा सारख्या सोशल मीडियाचा वापर जनजागृतीसाठी त्यांनी केला. रुग्णसेवेचे व जनजागृतीचे हे व्रत मागील 10 वर्षांपासून अविरत पणे चालू आहे. आज माईंडकेअर हॉस्पिटल रत्नागिरी जिल्ह्यातील व्यसनमुक्तीसाठी व मानसिक रुग्णांना भरती करण्याची सोय असलेले एकमेव रुग्णालय आहे तर लैंगिक समस्यासाठी कोकणातील अत्याधुनिक व अद्ययावत सुविधा असलेले एकमेव रुग्णालय आहे.

आतापर्यंत केलेल्या सेवेची ही पोहाचपावती आहे असे डॉ ढगे यांनी सांगितले.

या पुरस्काराचे श्रेय त्यांनी आपल्या कुटुंबियांना व त्यासोबतच त्यांच्या सर्व टीमला व आतापर्यंत त्यांच्यासोबत ज्यांनी काम केले त्या सर्वांना, तसेच मानसिक व लैंगिक आरोग्य क्षेत्रात, तसेच व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या सहकार्यास दिले.

रुग्ण व नातेवाईक ज्यांनी माईंडकेअर हॉस्पिटलच्या सेवेवर विश्वास ठेवला व सेवेचा मोका व आनंद दिला त्या बद्धल त्यांनी विशेष आभार मानले. एक शारिरीक आजाराचा रुग्ण बरा झाला की फक्त त्या व्यक्तीला बरे वाटते, पण एक मानसिक रुग्ण बरा झाला की त्यांच्या पूर्ण कुटुंबाची प्रगती होते किंवा त्रास कमी होतो. लैंगिक समस्यातून सुटका झाल्यामुळे कित्येकांचे संसार सुखी झाले आहेत तर कित्येकांचे संसार वाचले आहेत. या सर्व कार्यातून मिळणारे समाधान पुढील कार्यासाठी प्रोत्साहन व उर्मी देते. या पुरस्कारामुळे आमची जबाबदारी अजूनच वाढली आहे त्यामुळे यापूढे माईंड केअर हॉस्पिटल याहूनही उत्तम सेवा देण्याचे प्रयत्न करेल व मानसिक आरोग्य, लैंगिक आरोग्य व व्यसनमुक्ती क्षेत्रात यापुढे जाऊन जनजागृती करण्याची ग्वाही माईंड केअर हॉस्पिटल तर्फे डॉ अतुल ढगे यांनी दिली.