रत्नागिरी : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 'अतंर्गत चला जाणूया नदीला अभियान काजळी नदी संवर्धन- अमृतवाहिणी ग्रुप ग्रामपंचायत कणगवली- यरवंडे यांच्या विद्यमाने स्वच्छता ही सेवा, स्वच्छता पंधरवडा आणि महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने एक साथ, एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान मोहिमेत सहभाग घेऊन समूह ग्रामपंचायत कणगवली यरवंडे कार्यक्षेत्रातील. ग्रामपंचायत कार्यालय, जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा कणगवली परिसर तसेच सरकारी अस्थापनाचे स्वच्छता कणगवली गावातील साण धार्मीक अस्थापणे, गाव रस्ता दूर्तफा स.टी.प्रवासी थांबा , गणपती विसर्जन स्थळ, गावातील नैसर्गिक जलस्त्रोतांचे ठिकाणी स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवत संततधार पावसात परिसराची स्वच्छता केली.
या उपक्रमात प्रमुख उपस्थिती अनिल जयराम कांबळे, रोहन रमेश इंगळे. अशासकीय जिल्हा समिती सदस्य. संपदा दयाराम चव्हाण-पाटोले. सरपंच, विठ्ठल नारायण इंगळे. उपसरपंच, नंदिनी गणपत कांबळे. ग्रामसेविका, विजय गंगाराम इंगळे. सामाजिक कार्यकर्ते, अंगणवाडी पर्यवेक्षिका, रोजिना खालिद कासू, प्रतिक प्रमोद इंगळे, वेदिका विकास चव्हाण, अंगणवाडी सेविका, संदिप शांताराम इंगळे, मनीषा मनोहर शिंदे ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील महिला बचत गटातील महिला ग्रामस्थ व गावातील तरुण विद्यार्थी वर्गाने स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली.
चला जाणूया नदीला अभियाना अंतर्गत नदीचे स्वास्थ्य आणि मानवी आरोग्य याबाबत प्रचार व प्रसार हेतू काजळी नदी पानलोट क्षेत्रातील नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोतांचे ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवत यशस्वी करण्यात आली तसेच मौजे कणगवली यरवंडे मधाचे गाव करण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करत आहेत.












