फोंडाघाट : विविध संघटनांचे प्रतिनिधी व देशाच्या जागरूक नागरिकांनी एकत्र येत फोंडाघाटातील नयनरम्य पर्यटन स्थळांवर स्वच्छता मोहीम राबवली. विसावा पॉईंट ,मुख्य धबधबा आणि घोडे तळी ही पर्यटन स्थळे चकाचक केली. फोंडाघाटच्या सरपंच सौ संजना आग्रे ,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री संजय आग्रे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्री संदेश पटेल माजी सरपंच संतोष आग्रे यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. विसावा पॉईंट येते राष्ट्रगीत म्हणून व स्वच्छतेची शपथ घेऊन सर्वांनी कंबर कसून कामाला सुरुवात केली.विसावा पॉईंट चकाचक केल्यानंतर मुख्य धबधबा येथे ही मोहीम राबवण्यात आली त्यानंतर निसर्गरम्य घोडे तळी जवळील पर्यटन स्थळ चकाचक केले. पर्यटकांनी प्लास्टिक पिशव्या प्लास्टिक ग्लास काचेच्या बाटल्या प्लास्टिक बाटल्या मोठ्या प्रमाणावर टाकल्या होत्या या सर्व प्लास्टिक वस्तू स्वच्छता अभियानामध्ये गोळा करण्यात आल्या.
शक्य तिथे झाडी तोडून कचरा गोळा करून साफसफाई करण्यात आली. यावेळी गणेश जेठे, महेश सावंत,विशाल रेवडेकर, संजय सावंत, विश्वनाथ जाधव, दत्तात्रय मारकड,भाई हळदिवे, उदय मोदी, ग्रामविकास अधिकारी विलास कोलते,अनिल हळदिवे, मंडल अधिकारी दिलीप पाटील, मंडल अधिकारी नागावकर,वनरक्षक अतुल खोत ,राजू पटेल ,संजय नेरुरकर, संतोष टक्के, मंगेश कदम ,शैलेश परब, विद्याधर सावंत,राजा नानचे, विजय जामदार, सुधीर जोशी ,रंजन नेरुरकर ,मोहन पडवळ, सचिन राणे, , गुरु सावंत, सत्यवान साटम निलेश मेस्त्री ,सिद्धेश मोडकर, दरवेश परब, रोहित मोंडकर, ईश्वरदास पावसकर,चंद्रकांत लाड, सचिन नाकाडी,दीपक नवले, संतोष गुरव, रमाकांत म्हसकर,अरुण सुद या जागृत नागरिकांनी सहभाग घेतला तब्बल अडीच ते तीन तास नागरिकांनी श्रमदान केले. भाई हळदिवे यांनी तर सर्वांची नाश्त्याची व्यवस्था केली. संतोष पारकर आणि संजय नेरुरकर यांनीही श्रमदान करणाऱ्या नागरिकांना खाऊ वाटप केले. या उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे पाठपुरावा करून कचरा होऊ नये यासाठी काही सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी दिले.श्री संजय आग्रे यांनी फोंडा घाटातील पर्यटन स्थळे राज्य शासनाकडे पाठपुरावा करून विकसित करण्यात येतील अशी घोषणा यावेळी केली. सरपंच संजना आग्रे यांनी अशा प्रकारच्या स्वच्छता मोहिमा आवश्यक असून सर्व नागरिकांचे अभिनंदन केले व आभार मानले सर्वात शेवटी महेश सावंत यांनी सर्व उपस्थित आणि स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांचे आभार मानले.