गुहागर तालुकास्तरीय ५० व्या विज्ञान प्रदर्शन बक्षीस वितरण समारंभ संपन्न

Google search engine
Google search engine

पाटपन्हाळे | वार्ताहर : जिल्हा परिषद रत्नागिरी, पं.स. गुहागर शिक्षण विभाग, व शृंगारी एज्युकेशन सोसा. चे शृंगारी उर्दू हायस्कूल व कनिष्ट महाविद्यालय, शृंगारतळी यांच्या वतीने दोन दिवसीय गुहागर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन शृंगारी उर्दू हायस्कुल, शृंगारतळी येथील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विज्ञान नगरी येथे पार पडले. या विज्ञान प्रदर्शनामध्ये एकूण ५९ प्राथमिक शाळा व २३ माध्यमिक शाळा सहभागी झाल्या होत्या. प्राथमिक विद्यार्थी गट.. प्रतिकृतीमध्ये प्रथम कु. ईश्वरी धनिन सुर्वे शिवणे शाळा न.१, द्वितीय कु. शर्वरी सुनिल भुवड, शाळा वरवेली नं. २, तृतीय कृमाक कु.शितल प्रमोद गोणबरे, शाळा काजूर्ली नं. १, माध्यमिक व उच्च माध्य गट. विद्यार्थी प्रतिकृतीमध्ये प्रथम क्रमांक कु. प्रेम प्रदीप गावणंग, न्यू इंग्लीश स्कुल वेळणेश्वर, द्वितीय क्रमांक कु. आमिना ऐजाज काद्री, शृंगारी उर्दू हायस्कुल शृंगातली, तृतीय क्रमांक कु. निलेश मोहन मांडवकर, माध्य. विद्या. आबलोली माध्यमिक व उच्च माध्य. शिक्षक प्रतिकृती- प्रथम क्रमांक-पुराग मनोहर कदम, मुंढर हायस्कुल, द्वितीय क्रमांक- दत्ताराम निबोरे, पाटवन्हाळे हायस्कुल, तृतीय क्रमांक- मुनव्वर अ. रज्जाक शेख, शृंगारी उर्दू हायस्कुल प्रयोगशाळा परिचर प्रतिकृती- प्रथम क्रमाक – संतोष पांचाळ, पाटपन्हाळे हायस्कुळ, द्वितीय क्रमांक दिलीप रामचंद्र मोहिते, गुहागर हायस्कुल, तृतीय क्रमांक- शिवराज झगडे, पालशेत हायस्कुल, प्रश्नमंजुषा मध्ये प्रथम क्रमांक श्रुतिक अर्जुन आग्रे, अक्षय डिंगणकर, कोळवली हायस्कुल द्वितीय क्रमांक- रिया विचारे, वेदांत गुरव, पाटपन्हाळे हायस्कुल, तृतीय क्रमांक आर्या पाटील, जिनल ठोंबरे, शीर हायस्कुल, प्राथमिक शिक्षक प्रतिकृती- प्रथम अमोल चौधरी आदर्श शाळा देवघर द्वितीय प्रकाश गोरे, शाळा तळवली न.३, तृतीय हवा उस्मान गणी काझी, अली पब्लिक स्कूल, शृंगारतळी, उलेजनार्थ- सतीश मुणगेकर झोंबडी – न. १, दशरथ कदम मुंढर नं. १, बाबासाहेब राशीनकर पालशेत नं. १ निबंध स्पर्धा गट १ ली ते ५ वी मध्ये प्रथम आहट बारगोडे वेळंब न. २, द्वितीय- पायल गोणबरे झोबडी कारकरवाडी, तृतीय आतीया सर्फराज परकार शृंगारी उर्दू, गट ६ वी ते ७ वी. प्रथम प्रियल कांबळे, साखरी आगर, द्वितीय-तहीरा दाऊद जांभारकर, शृंगारी उर्दू हायस्कूल, तृतीय-मुस्तफा मुनदरोगा अंतीय मंजना तांडेल, हेदवी हायस्कुल, निबंध स्पर्धा गट ९ वी ते १२वी. प्रथम मुझम्मील हुसैन बोट शृंगारी उर्दू हायस्कुल द्वितीय- समृद्धी सचिन मोहिते गुहागर हायस्कुल, तृतीय प्रसाद सहिबोले न्यूभारत उर्दू हायस्कुल, अंजनवेल विजेत्याना सम्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या बक्षिस वितरण कार्यक्रमाला शृंगारी उर्दू एज्युकेशन सोसा. चे उपाध्यक्ष शब्बीर बोट, फारूक महाते, लियाकत मुकादम, शब्बीर अली महाते गधिकाधिकारी लीना भागवत, शृंगारी उर्दू हायस्कुल मुख्या. शगुफ्ता सौराज, उपसरपंच असिम साल्हे, नदीम मालाणी, शोएब मालानी नूरमहमंद काझी, मौलाना तबरेज धामस्कर अहमद धामस्कर, सकीना घामस्कर, जहुर बोट, रमजान साल्हे आदी मान्यवर उपस्थित होते.