आमदार नितेश राणे यांच्या आग्रहामुळे विशेष बैठकीचे आयोजन
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुचणे नुसार कोल्हापूर येथून उपस्थित राहणार विभागाचे अधिकारी
कणकवली :बीएसएनएल च्या नेटवर्क समस्येबाबत प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार नितेश राणे आग्रही आहेत. त्यांच्या मागणीनुसार आज ७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता प्रहार भवन येथे बीएसएनएल च्या कोल्हापूर विभागाचे अधिकारी श्री पाटील यांच्या सह प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विषय बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.या बैठकीला उपस्थित राहून आपले प्रश्न मांडावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात बीएसएनएल च्या नेटवर्क समस्येबाबत सातत्याने जनतेमधून संताप व्यक्त केला जात असताना ही समस्या सोडविण्याच्या दृष्टीने बीएसएनएलचे महाराष्ट्र व गोवाचे प्रमुख रोहित शर्मा यांच्याशी भेट घेत आमदार नितेश राणे यांनी चर्चा केली होती. त्यांनतर कणकवली मतदारसंघातील कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यांमध्ये बीएसएनएलच्या असलेल्या समस्यांबाबत तसेच बीएसएनएलचे नव्याने उभारले जाणारे टॉवर, किंवा यापूर्वी उभारणी करण्यात आलेल्या टॉवर ची कनेक्टिव्हिटी असे अनेक प्रश्नी आहेत त्यावर आज 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता प्रहार भवन येथे होणाऱ्या बैठकीत ठोस निर्णय होणार आहे.