आरोस गावातील नेटवर्क समस्येबाबत मनसेची बीएसएनएल कार्यालयात धडक

Google search engine
Google search engine

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील आरोस गावात मागील तीन दिवस नेटवर्क मिळत नसल्याने आलेल्या ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बीएसएनएल कार्यालयाला भेट देत जिल्हा प्रबंधक रविकिरण जन्नू यांच्याशी वारंवार होणाऱ्या रेंजच्या समस्यांविषयी चर्चा केली. यावेळी याबाबतचे काम सुरू असल्याचे सांगत उद्यापर्यंत आरोस गावातील रेंज पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याचे जन्नू यांनी आश्वासन दिले. तसेच गावातील इंटरनेट संदर्भातही अनेक समस्या असल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. इंटरनेट व रेंज सुरळीत ठेवा अन्यथा गावातील लोकांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल केसरकर, परिवहन सेना जिल्हाध्यक्ष राजू कासकर, माजी संपर्क अध्यक्ष महेश परब, कौस्तुभ नाईक, प्रवीण गवस, बाळा बहिरे, मिलिंद सावंत, सुनील आसवेकर आदी उपस्थित होते.