मंडणगड | प्रतिनिधी : भारतीय उद्योजकता विकास संस्था व टाटा कम्युनिकेशन्स यांचे संयुक्त विद्यमाने मंडणगड तालुक्यातील अनु.जाती व अनु जमाती प्रवर्गातील महिलांकरिता एक महिना कालावधीचा निशुल्क उद्योदकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाची सविस्तर माहीती देण्यासाठी 11 जानेवारी 2023 रोजी समाज मंदिर कुंबळे येथे सकाळी 11.00 ते 2.00 या वेळत याचबरोबर 12 जानेवारी 2023 रोजी पंचायत समिती मंडणगड येथे सकाळी 11.00 ते 2.00 या वेळेत जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्योजकता परिचय कार्यक्रमातून इच्छुक महिलांचे अर्ज भरुन त्यांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे प्रशिक्षणाकरिता निवड करण्यात येणार आहे. प्रशिक्षणात सहभागी होण्याकरिता आवश्यक पात्रता अनु.जाती जमाती प्रवर्गातील महिला असावी ती किमान सातवी पास असावी वय 18 ते 45 दरम्यान असावी तसेच उद्योग क्षेत्रात कार्य करण्यास इच्छुक असावी. अधिक माहीतीकरिता सौ.रोशनी मर्चंडे मंडणगड यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन कऱण्यात आले आहे