डॉ संतोष केळकर यांना मातृशोक

कणकवली : नरडवे येथील सौ. गीता गणेश केळकर यांचे मंगळवार ३ ऑक्टोबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती डॉ. गणेश दत्तात्रय केळकर व तीन मुलगे,सूना नातवंडे असा परिवार आहे. कणकवली येथील प्रसिद्ध डॉ संतोष केळकर यांच्या त्या मातोश्री होत.