माखजन हायस्कूल मध्ये धन्वंतरी उद्यानाची निर्मिती

माखजन |वार्ताहर :     आयुर्वेदाची भारताना अति प्राचीन परंपरा आहे.अगदी अथर्ववेदात आयुर्वेदिक उपचारपद्धती मांडली आहे.आयुर्वेदाचा अभ्यास करण्यात भारताचा ग्रक्रम लागतो.मध्यंतरीच्या काळात अलोपाथी च्या उपचार पद्धतीचा सर्रास उपयोग होऊ लागला होता.दुष्परिणामांची जाणीव होऊ लागल्यावर,अलीकडे अनेक रुग्ण आयुर्वेद व होमिओपॅथी कडे वळू लागले आहेत.बाल वयातच आपल्या आयुर्वेदाच्या प्राचीन परंपरेविषयी विद्यार्थ्यांना जाणीव व्हावी व माहिती मिळावी यासाठी माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल मध्ये धन्वंतरी उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे.

संस्थेच्या संकल्पनेतून व हरित सेना विभागाच्या पुढाकाराने या उद्यानाची निर्मिती झाली आहे.यामध्ये मुरुड शेंग,वाळा,कोरफड,आवळा,प्राजक्त,सब्जा,वावडींग,आरारोठ,अडुळसा,शिककाई,नोनी,सर्पगंधा,आघाडा,चिचूरडा,शतावरी,कुडा,आंबे हळद,साधी हळद, गवती चहा,नागफणी,पानफुटी,ब्राह्मी,कोरफड,अर्जुन,पेरू,बहवा,विविध प्रकारच्या तुळशी आदी ५० हून अधिक वनऔषधीं ची लागवड करण्यात आली आहे.

धन्वंतरी उद्यान् निर्मिती मध्ये विध्यार्थ्यांची मोठी मेहनत आहे.यामध्ये हरितसेना विभाग प्रमुख विठ्ठल भोईर,सचिन साठे यांनी मेहनत घेतली.विद्यार्थ्यांना शाळा स्तरावर आयुर्वेदिक उपचार पद्धतीचे महत्व व लागवडीचे महत्व कळले तर भविष्यात अनेकजण आयुर्वेदकडे वळतील असा विश्वास संस्था अध्यक्ष आनंद साठे यांनी व्यक्त केला.विद्यार्थ्यांना माहिती देताना स्वतः मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर,संस्था संचालक दत्ताराम गुरव आदी उपस्थित होते.