चैतन्य आर्ट्स संस्थेने केला गौरव
चिपळूण : चैतन्य आर्ट्स या संस्थेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त आषाढ वारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच वेळी चैतन्य आर्ट्स च्या माध्यमातून समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या काही व्यक्तींना जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये आगवे गावचे सुपुत्र लोककलावंत आणि एक सेवानिवृत्त शिक्षक महादेव नाचरे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
चैतन्य आर्ट्स यांनी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये सादर केलेला आषाढ वारी या भक्तीमय कार्यक्रमांमध्येच त्यांनी समाजातील अनेक क्षेत्रातील काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान केला. यामध्ये जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित झालेले सेवानिवृत्त शिक्षक आणि शक्ती तुऱ्यातील गाढा अभ्यास असणारे शाहीर म्हणून ज्यांची ओळख आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत चैतन्य आर्ट्स संस्थेने महादेव नाचरे यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. महादेव नाचरे यांनी शिक्षकी पेशा सांभाळत असतानाच शक्ती तुरा ही लोककला सुद्धा जपली आहे. त्यांना शास्त्र पुराणातील गाढे अभ्यासक म्हणून त्यांची ओळख आहे. शांत आणि प्रेमळ स्वभावामुळे त्यांचे सर्वांशी जिव्हाळ्याचे नाते आहे. त्यांची शास्त्र आणि पुराणातील मांडणी अतिशय उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे. शिक्षक पेशा सांभाळताना त्यांनी अनेक विद्यार्थी सुद्धा घडवले आहेत. अनेक विद्यार्थी आज उच्च पदावरती कार्यरत आहेत. सध्या श्री नाचरे हे चिपळूण शंकरवाडी येथे वास्तव्यस आहेत. अशा व्यक्तिमत्त्वाचा चैतन्य आर्ट्स संस्थेमार्फत जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. भाजपाचे शहराध्यक्ष शशिकांत मोदी, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश काने यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अनेक क्षेत्रातील मान्यवर मंडळी सुद्धा उपस्थित होती. संस्थेचे अध्यक्ष दत्ताराम निर्मळ सचिव अरविंद जोगळे आणि सर्व पदाधिकारी यांनी अतिशय मेहनत घेत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.












