Crime News | कारचालकाकडून महिलेचा विनयभंग ; कणकवली पोलिसात तक्रार

 

 

कणकवली : तालुक्यानजिकच्या एका गावातील महिला ही कणकवली येथे आली होती. त्या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार ती महिला आपले कणकवली येथील काम आटोपून घरी जात असताना गावाजवळ पोहोचल्यावर मागाहून तिचा पाठलाग करत एक चारचाकी कार आली. त्या चारचाकी कार चालकाने गाडी थांबवुन मनात लज्जा उत्पन्न होइल असे वक्तव्य केले. लागलीच त्या महिलेने कारचा मोबाईलमध्ये फोटो काढला व आपल्या घरी कळविले. त्यानंतर या घटनेची तक्रार कणकवली पोलिसात देण्यात आली. ही घटना शनिवारी सायंकाळी ३ वा. च्या सुमारास घडली. याबाबत कणकवली पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कणकवली पोलिस ठाण्याचे एपीआय श्री. पाटील अधिक तपास करत आहेत.