वेंगुर्ले शिवसेनेतर्फे दि. 17 रोजी पाककला व संगीत खुर्ची स्पर्धा

 

वेंगुर्ले (प्रतिनिधी)- वेंगुर्ला महिला शहर शिवसेनेतर्फे नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून दि. १७ ऑक्टोंबर मारूती स्टॉप नजीकच्या सप्तसागर कॉम्लेक्स येथील शिवसेना कार्यालयात येथे संगीत खुर्ची, पाककला स्पर्धा इतर मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
वेंगुर्ले शिवसेनेच्या माध्यमातून नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून दि. 17 आँक्टोंबर रोजी सकाळी 10 वाजता सत्त्यनारायण महापुजा, तीर्थ प्रसाद, सायंकाळी 5 वाजता पाककला स्पर्धा (नाचणी पासून बनविलेले पदार्थ), संध्याकाळी ६ वाजता संगीत खुर्ची स्पर्धा, त्यानंतर मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत. यातील पाककला व संगीत खुर्ची स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांनी दि. १५ ऑक्टोंबर पर्यंत आपली नावे श्रध्दा बावीस्कर परब मनाली परब, शबाना शेख, रसिका राऊळ-९९२३६७५५८१. यांचकडे नोंदवावीत. यासर्व कार्यक्रमांचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन शिवसेनेचे तालुका प्रमुख नितीन मांजरेकर व वेंगुर्ले शहर प्रमुख उमेश येरम यांनी केले आहे.