आरटीओकडून तहसीलदारांची परवानगी घेऊन कारवाई होत असल्याची खोटी माहिती झाली उघड
कणकवली : तालुक्यातील तहसिलदार कार्यालयाच्या आवारात हेल्मेट न वापरणाऱ्या, तसेच सीटबेल्ट न वापरणाऱ्या वाहन चालकांवर सिंधुदुर्ग आरटीओकडून कारवाईचा बडगा सुरू होता. या कारवाईला कारवाईला भाजपा व ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. मात्र यावरून आरटीओच्या अधिकाऱ्यांमध्ये आणि भाजपा, ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा वादंग निर्माण झाला.
मात्र तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात परवानगी शिवाय होणाऱ्या कारवाईला विरोध झाला. अखेर तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांच्याकडे झालेल्या चर्चे अंती आवारात केलेल्या वाहनांवरील कारवाईची रक्कम परत देण्याबाबत तोडगा काढण्यात आला . तसेच आधी जनजागृती करा मग कारवाई करा, अशी मागणी देखील कार्यकर्त्यांनी केली आहे.
यावेळी भाजपचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, समीर प्रभुगवकर, संतोष पुजारे, भाजपाचे महेश लाड, पप्पू यादव सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
मात्र एकंदरीत परिस्थिती जरी अशी आली तरी आरटीओ च्या कामकाजावर नाराजी देखील मोठ्या प्रमाणात आहे. केवळ टार्गेट पूर्ण करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या कारणाने सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या होत्या. मात्र यानंतर यात तहसीलदार दीक्षांत देशपांडे व स्थानिक पोलीस प्रशासनाच्यावतीने याप्रकारावर तोडगा काढण्यात आला.










