शेवरे स्मशानभूमीतील सौरपथदीपाचे लोकार्पण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने उपक्रम

शिरगाव (वार्ताहर) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने देवगड तालुक्यातील शेवरे गावच्या स्मशानभूमी आवारातील सौरपथदीपाचे लोकार्पण करण्यात आले. शेवरे स्मशानभूमीत दिवाबत्तीची सोय नसल्याने सायंकाळनंतर अत्यंविधी कार्यक्रमास गैरसोय होत होती. याबाबत स्मशानभूमी आवारात सौरपथदीप बसवून मिळावा अशी येथील ग्रामस्थांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे निवेदनाव्दारे मागणी केली होती .त्याप्रमाणे येथे सौरपथदीप बसवून हि मागणी पूर्ण झाल्याने ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी अशोक साटम, जयवंत साटम, अनंत घाडी, मंगेश पवार, दिंगबर साटम, श्रीकांत पवार, संतोष साटम, गणेश पवार, मोहन पवार आदी मान्यवर उपस्थित होते.