२३ ते ३० ऑक्टोबर ११ ते २ ; लाभ घेण्याचे आवाहन
रत्नागिरी : शैक्षणिक, सेवा, निवडणूक व इतर प्रयोजनार्थ सादर जात वैधता प्रमाणपत्र प्रस्तावांचे
अनुषंगाने १५ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत राज्यात विशेष मोहीम
राबिवण्यात येत आहे. जिल्हयातही २३ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०२३ पर्यंत स. ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत जिल्हा
जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, रत्नागिरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, डीमार्ट
समोर,कुवारबांव, रत्नागिरी ४१५६१२ या ठिकाणी त्रुटीपुर्तता शिबीर आयोजित करण्यात येत आहे. अर्जदारांनी या
शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती
संतोष चिकणे यांनी केले आहे. अनु. जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान किंवा तंत्रनिकेतन (डिप्लोमा इंजिनिअरिंग) या वर्गात शिकत असलेले विद्यार्थी, शासकीय/निमशासकीय सेवेतील कर्मचारी, सार्वत्रिक निवडणूकीत निवडून आलेले उमेदवार, इ. अर्जदारांनी ३० सप्टेंबर २०२३ पुर्वी समितीस दाखल केलेल्या अर्जाच्या बाबतीत ज्या अर्जदारांना अद्याप जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही, अशा अर्जदारांसाठी २३ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०२३ पर्यंत स. ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, रत्नागिरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, डीमार्ट समोर,कुवारबांव, रत्नागिरी ४१५६१२ या ठिकाणी त्रुटीपुर्तता शिबीर आयोजित करण्यात येत आहे.











