प्राथमिक आरोग्य केंद्र साटवली येथे जागतिक आयोडिन न्यूनता विकार दिन कार्यक्रम संपन्न

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र साटवलीच्या वतीने राष्ट्रीय आयोडिन न्यूनता विकार नियंत्रण दिन आज शनिवारी २१ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला साटवली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनिल पैठणकर, आरोग्य सहाय्यक डी.के.सावरटकर, मुख्य आरोग्य सेविका श्रीम. एस.बी.सावंत तसेच प्रसाद नेमण, ओंकार शिरवडकर , सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी डॉ. पैठकर यांनी मार्गदर्शन करताना आयोडिन न्यूनता विकार यांच्याविषयी मार्गदर्शन केले. आयोडिन मिठाचा वापर करणे, आयोडिनचे प्रमाण किती आहे ते तपासणे, आयोडिन प्रमाण कमी असल्यास कोणते आजार होऊ शकतात, आयोडिन मिठाचे फायदे तोटे याबाबतची सविस्तर माहिती दिली. गरोदर मातेला आयोडीनयुक्त मिठाची कशी गरज आहे, त्यामुळे जन्माला येणाऱ्या बाळाला अपंगआत्वर कशी मात करता येईल, शारिरीक वाढ उत्तम होईल असे सांगितले.