किस्ना डायमंड अॅन्ड गोल्ड ज्वेलरी प्रदर्शन व विक्री शिबिराला ग्राहकांचा उस्फुर्त प्रतिसाद

 

ए. डी. मालपेकर ज्वेलर्सच्या वतीने आयोजन

राजापूर (प्रतिनिधी): शहरातील ए. डी. मालपेकर ज्वेलर्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या किस्ना डायमंड अॅन्ड गोल्ड ज्वेलरी प्रदर्शन व विक्री शिबिराला ग्राहकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.

शहरातील प्रसिध्द सुवर्णकार संदीप मालपेकर यांच्या ए. डी. मालपेकर ज्वेलर्सच्या वतीने या किस्ना डायमंड अॅन्ड गोल्ड ज्वेलरी प्रदर्शन व विक्री शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. १० जानेवारी ते १३ जानेवारी या कालावधीत ग्राहकांसाठी हे शिबीर खुले रहाणार आहे. याचा शुभारंभ गुरूवारी शहरातील ए. डी. मालपेकर ज्वेलर्सचे मालक संदीप मालपेकर, सौ. संजीवनी मालपेकर व किस्ना डायमंड अॅन्ड गोल्ड ज्वेलरीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग विभागाचे मॅनेजर राकेश बेंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

या प्रदर्शनामध्ये किस्ना डायमंड अॅन्ड गोल्ड ज्वेलरीचे विविध प्रकारचे डायमंड अॅन्ड गोल्डचे दागीने विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. कमीत कमी दरात चांगल्या प्रकारचे दागिने या ठीकाणी ग्राहकांना पहाता येणार आहेत. दहा हजार पेक्षा अधिक डिझाईन, दागिन्यांचा विमा, आयजीआर प्रमाणपत्र, हॉलमार्क यांसारख्या सुविधा ग्राहकांसाठी असणार आहेत.

या शिबीराला गुरूवारी शुभारंभाच्या दिवशी ग्राहकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. पुढील दोन दिवस हे शिबीर ग्राहकांसाठी खुले रहाणार असून ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संदीप मालपेकर, सौ. संजीवनी मालपेकर यांनी केले आहे.