राजापूर | प्रतिनिधी : जुलै २०२३ मध्ये रंगोत्सव सेलिब्रेशन संस्थेमार्फत विविध कलास्पर्धांचे राष्ट्रीय पातळीवर आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नवजीवनच्या २७ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता आणि त्यातील १० विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. त्यांची नावे पुढीलप्रमाणे:
सुवर्णपदक पटकाविणारे विद्यार्थी :- अलीझा तहरीन तन्वीर अहमद खान (हस्ताक्षर स्पर्धा), सफवाना इकबाल हाजू (रंगभरण स्पर्धा), शमसीया सलीम कोतवडकर (रेखाटन स्पर्धा), तहरीन शब्बीर नाखेरकर (कोलाज बनविणे), व सौदा एजाज पन्हळेकर (भेटकार्ड). तर चांदीचे पदक पटकाविणारे विद्यार्थी आहेत : स्वालिहा सिराज खान (हस्ताक्षर स्पर्धा), आयान मुख्तार खान (रंगभरण स्पर्धा), अलीझा तहरीन तन्वीर अहमद खान (कार्टून बनविणे), शिवाय कांस्यपदकाचे मानकरी आहेत:, तहरीन शब्बीर नाखेरकर (हस्ताक्षर स्पर्धा), समरीन इकबाल हाजू (कोलाज बनविणे). विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांची पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड झालेली आहे. यासाठी कला शिक्षिका श्रीम. झीनत महाडीक व सहाय्यक शिक्षिका श्रीम. आशना होलसेकर यांनी विशेष मेहनत घेतली. प्राचार्य व्हनमाने सरांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांनी आपले मनोबल कसे वाढवावे, यश कसे संपादन करावे याबाबत मार्गदर्शन केले.सदर विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे मा. अध्यक्ष श्री. सुलतान ठाकूर, सचिव श्री. मजीद पन्हळेकर व सर्व पदाधिकारी व प्राचार्य श्री. राजेंद्रकुमार व्हनमाने, तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.












