राज्यातील कंत्राटी भरती हे आघाडी सरकारचा तिघां नेत्यांचे पाप: राजेद्र म्हापसेकर

दोडामार्ग – सुहास देसाई l राज्यात जी कंत्राटी भरती करण्यात येणार होती ती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी मुख्यमंत्री तथा उबाठा शिवसेनेचे उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याच मुळे करण्यात येत होती. राज्यातील कंत्राटी भरतीचे पापही या तिघांचेच आहे त्यामुळे या तिघांच्या महविकास आघाडी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो असे दोडामार्ग भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले आहे. पत्रकार परिषदेनंतर येथील पिंपळेश्वर चौकात शरद पवार, उद्धव ठाकरे व नाना पटोले यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेवर चप्पल मारत ‘जोडो मारो आंदोलनही’ केले.

 

येथील स्नेह रेसिडेन्सी येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजप पदाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, एकनाथ नाडकर्णी, तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, नगरसेवक संतोष नानचे, राजेश प्रसादी, चंदू मळीक, रमेश दळवी, शंकर देसाई, तळकट सरपंच सुरेंद्र सावंत – भोसले, नाना देसाई, प्रवीण आरोंदेकर यांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

यावेळी श्री. म्हापसेकर म्हणाले की, गेले काही दिवस कंत्राटी भरतीच्या मुद्द्यांवरून राज्यात प्रचंड गोंधळ सुरू केला आहे. राज्य सरकारच्या निर्णयावर विरोधकांकडून सातत्याने आरोप केले जात आहेत. मात्र कंत्राटी भरतीचा पहिला निर्णय सुशीलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना घेतला. त्यानंतर अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना तीन जीआर निघाले. त्यात शिक्षकापासून विविध पदांवर कंत्राटदार लोकांना घ्यायची तरतूद करण्यात आली. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना कंत्राटी भरतीचे तीन जीआर निघाले होते असेही आमच्या सरकारने तर कंत्राटी भरतीचे जीआर च रद्द केले आहेत असे म्हापसेकर यांनी स्पष्ट केले.

 

[