ओटवणे दसरोत्सव २३ व २४ ऑक्टोबर ला

ओटवणे(प्रतिनीधी) सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे गावचा राजेशाही सण म्हणून ज्याची ख्याती जिल्ह्यासह जिल्हा बाहेरही आहे तो ओटवणे गावचा दसरोत्सव उद्या २३ ऑक्टोबर म्हणजे सोमवार आणि २४ऑक्टोबर मंगळवार या दिवशी साजरा होत असून या निमित्त मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण पसरले असून या राजेशाही सणाची जय्यत तयारी सुरू आहे खंडे नवमी आणि दशमी या दोन्ही दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून खंडेनवमी दिवशी शिवलग्न सोहळा इंगुळके नहाणे आदीसह साकडे घालणे, नवस बोलणे फेडणे आदि कार्यक्रम तर दशमी दिनी ही विवीध कार्यक्रम पार पडणार आहेत व दशमी दिनी गावकौलाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.दोन्ही दिवस विविध धार्मिक कार्यक्रम साजरे होणार आहेत या कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान प्रमुख रवींद्रनाथ गावकर यांनी केले आहे.