कोचरा मायनेवाडी येथील विवाहित महिला बेपत्ता

 

वेंगुर्ले : प्रतिनिधी
कोचरा मायनेवाडी येथील विवाहित महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या नवऱ्याने दिल्याने निवती पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
सौ. गौतमी गंगाराम राऊळ असे त्या महिलेचे नाव आहे. ती डॉक्टर कडे जातो असे सांगून काल रविवारी घरातून निघून गेली ती अद्याप घरी परतली नाही. असे तिचा नवरा गंगाराम राऊळ राऊळ यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी नापता म्हणून नोंद केली असून पोलीस हवालदार भांगरे हे अधिक तपास करत आहेत.