वेंगुर्लेतील श्री देव पूर्वस मंदिर समईंच्या प्रकाशाने उजळले…

वेंगुर्लेतील श्री देव पूर्वस मंदिर समईंच्या प्रकाशाने उजळले…

वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले शहरातील श्री देव पूर्वस मंदिरात आज नवरात्रीच्या नवव्या दिवशी खंडेनवमीचे औचित्य साधून मंदिरात सर्वत्र समई प्रज्वलित केल्याने मंदिर समईंच्या प्रकाशाने उजळून निघाले आहे.


वेंगुर्ले येथील या पूर्वस मंदिरात नवरात्रौत्सवामुळे गेले नऊ दिवस देवाची पूजाअर्चा या नित्य उपक्रमाबरोबर रोज विविध भजन कार्यक्रमांमुळे वातावरण भक्तिमय बनले आहे. दरम्यान आज सायंकाळी मंदिरात सर्वत्र समई प्रज्वलित केल्याने संपूर्ण मंदिर प्रकाषमय बनले आहे. परब मानकरी दरवर्षी हा उत्सव साजरा करत असून आजच्या या दीपोत्सवाने मंदिर उजळुन गेल्याने भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत.