सावंतवाडी । प्रतिनिधी : अयोध्येतील राममंदिर ही कोट्यवधी भारतीयांचा मनातील इच्छा असून तीआता पूर्ण होत आहे. अयोध्या नगरीत २२ जानेवारी रोजी राम मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. त्यामुळे आपले स्वप्न साकार होत असल्याचा आनंद सर्व जनतेच्या मनात आहे, असे प्रतिपादन माजी आमदार राजन तेली यांनी केले.

अयोध्येवरुन आलेल्या निमंत्रण मंत्राक्षताच्या मंगल कलशाची भव्य पालखी शोभायात्रा बुधवारी सायंकाळी सावंतवाडी शहरातील कोलगाव दरवाजा येथून काढण्यात आली. यावेळी पुष्पवृष्टी करून राम भक्तांनी राम नामाचा जयघोष केला. या यात्रेत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली उपस्थित होते. ते म्हणाले, मागील काही वर्षांपासून ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता साकार होत आहे. अखेर मोदी सरकारने तमाम देशवासियांची ही इच्छा पूर्ण केली असून देशभरात एक उत्साहाचे वातावरण सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे मी मनापासून सर्व रामभक्तांना शुभेच्छा देतो, असे तेली यावेळी म्हणाले.
यावेळी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखम राजे भोंसले, भाजपचे जिल्हा कार्यकारणी सदस्य मनोज नाईक, माजी नगरसेवक आनंद नेवगी, दिपाली भालेकर, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी शहर अध्यक्ष संजू शिरोडकर, किशोर चिटणीस, दिलीप भालेकर, बाळ पुराणिक, संतोष गांवस, केतन आजगांवकर,चिन्मय रानडे, निखिल गावड, शैलेश पै, अण्णा म्हापसेकर, राजू केळुसकर, श्रेया आडीवरेकर, स्नेहा वझे, सुनील सावंत यांसह नागरिक व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.










