दापोली | प्रतिनिधी :- दापोली दाभोळ रस्त्यावर वळणे एमआय डी सी येथे एसटी आणि कार मध्ये अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार दापोली कडून नितीन जाधव हे आपली कार घेऊन दाभोळकडे निघाले असता समोरून येणाऱ्या एसटी चालकाचा आपल्या एसटी वरील ताबा सुटला आणि कारला घासत उजव्या बाजूने एसटी पुढे गेली. यामुळे कारचे उजव्या बाजूचे चालकाच्या बाजूचे खूप नुकसान झाले आहे .कारमधील कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र एसटीतीलच एका महिलेचा हात हा जायबंदी झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
एकंदरीतच एसटीची दुरावस्था, एसटी चालकांकडून होणारे वारंवार अपघात, अनियंत्रित वेळापत्रक या सगळ्या गर्तेतच एसटी पुढील प्रश्नचिन्हांच्या यादीत वाढ होत आहे. याबाबतीत वाहतूक नियंत्रक आणि दापोली एसटी आगारप्रमुखांकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा नागरिकांनी केली आहे. अपघाताच्या घटनेचा पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत












