सरपंचपदासाठी ओटवमध्ये दुरंगी तर बेळणे खुर्दत तिरंगी लढत

 

कणकवली : ग्रा.पं निवडणुकीमध्ये ओटवमध्ये सरपंचपदासाठी रुहिता राजेश तांबे व कविता धर्माजी तांबे यांच्यामध्ये लढत होणार आहे तर बेळणे खुर्द ग्रा.पं मध्ये विलास बाबुराव करांडे, लक्ष्मण यशवंत चाळके व अविनाश राजाराम गिरकर असे तीन उमेद्वार रिंगणात आहेत. कणकवली तालुक्यात ओटव व बेळणे खुर्द हे दोन ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणुक तर काही ग्रा.पं च्या जागांची पोट निवडणुक होत आहे. उमेद्वारी अर्ज मागे घेण्याच्या बुधवारी शेवटच्या दिवशी ओटव ग्रा. पं च्या सरपंचपदासाठी दाखल केलेला अर्ज दिक्षा जाधव यांनी मागे घेतला. इतर ग्रा.पं च्या सदस्य पदांसाठी 9 जणांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामध्ये लोरे ग्रा. पं च्या प्रभाग 3 मधुन प्रशांत तेली यांनी अर्ज मागे घेतल्याने जयदास तेली यांची बिनविरोध निवड झाली. वारगांव ग्रा.पं च्या प्रभाग 2 मधील 1 जागेसाठी 4 अर्ज दाखल होते.

त्यापैकी शैलेश कोकाटे व रोहित लिंगायत यांनी अर्ज मागे घेतल्याने प्रमोद केसरकर व महेंद्र केसरकर यांच्यात लढत होणार आहे. हळवल ग्रा.पं च्या प्रभाग 1 मधील 1 जागेसाठी 6 अर्ज दाखल झाले होते. त्यातील मारुती सावंत, तातू राणे, प्रज्ञेश राणे व सुदर्शन राणे अशा 4 जणांनी उमेद्वारी अर्ज मागे घेतल्याने प्रभाकर राणे व सुभाष राणे यांच्यात लढत होणार आहे. तर फोंडाघाट ग्रा.पं. च्या प्रभाग 4 मधील 1 जागेसाठी 3 अर्ज दाखल होते. त्यातील दिव्यता गोसावी व दर्शना पेडणेकर यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अवंती अनंत सावंत यांची बिनविरोध निवड झाली आहे.

बेळणे खुर्द ग्रा.पं च्या 7 जागांपैकी 5 जागांवर प्रत्येकी एक अर्ज आल्याने त्या बिनविरोध झाल्या होत्या. तर प्रभाग 1 मध्ये एका जागेसाठी राजेंद्र वसंत चाळके व उदय रमेश चाळके यांच्यात लढत होणार आहे तर प्रभाग 3 मधील 1 जागेसाठी विलास बाबुराव करांडे व सिद्धार्थ गंगाराम तांबे असे दोन उमेद्वार रिंगणात आहेत. त्यामुळे बेळणे खुर्दमध्ये सरपंच व दोन सदस्यांसाठी निवडणुक होणार आहे.

ओटव ग्रा.पं च्या सरपंचपदासाठी 2 उमेदवार रिंगणात असून सदस्यांच्या 7 जागांपैकी 4 जागांवर प्रत्येकी एक अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित 3 जागांसाठी 6 उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग 1 मध्ये दिक्षा दिलीप जाधव व कविता धर्माजी तांबे यांच्यात लढत होणार आहे. प्रभाग 3 मधील सर्वसाधारण स्त्री जागांसाठी वैष्णवी गावंकर व अनुष्का तांबे तर नामाप्र स्त्री जागेसाठी लता तेली व गारगी गावंकर यांच्यात लढत होणार आहे.