जमाबंदी आयुक्त कार्यालयात ई-प्रणाली बाबतच्या स्थायी समितीची बैठक
कणकवली : ई – पिकपहाणी, ई – फेरफार, ई – चावडी, ई – हक्क इ. ई – प्रणालीमध्ये काम करताना येणाऱ्या समस्या सोडविसाठी रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघाच्यावतीने आंदोलन छेडण्यात आले. शेतकरी व तलाठी यांना ई – पिक पहाणीमध्ये काम करताना अडचणी येत असल्याने कायमपड/फळशेती या करीता कॉपी पेस्ट सुविधा पुरविण्याचे मान्य केले. तसेच ई – फेरफारा मध्ये काम करताना दिवसा कार्यालयीन वेळेतही पुर्ण कार्यक्षमतेने जलदगतीने काम करता यावे या करीता दोन्ही जिल्ह्यासाठी सर्व्हर मध्ये स्वतंत्र स्पेस वाढविण्याचे मान्य केले. तसेच दोन्ही जिल्ह्याकरीता स्वतंत्र सर्व्हर देणेचे मान्य केले. तसेच ई-फेरफार व ई – चावडी मध्ये काम करताना येणा-या अडचणींच्या अनुषंगाने सुधारणा करणे करीता शासन स्तरावर प्रस्ताव पाठवुन योग्य त्या सुधारणा केल्या जाणार असल्याचे मान्य केले. संघटनेच्या पदाधिकारी यांचे समवेत झालेल्या सर्व विषयांची चर्चा पुन्हा अप्पर जमाबंदी आयुक्त श्री. रायते यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय स्थायी समीतीच्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होऊन वरील सर्व विषयाबाबत संघटनेला आश्वासीत केलेल्या विषयांबाबत समितीच्या बैठकीतही चर्चा होऊन मान्यता देण्यात आली. त्यामुळे अतिरिक्त पदभार असलेल्या सजा कार्यालयांच्या चाव्या मागे घेत आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष सत्यवान गवस यांनी दिली.
आंदोलनातीला मागण्यांप्रमाणे गुरुवारी जमाबंदी आयुक्त कार्यालयात ई – प्रणाली बाबतच्या स्थायी समितीची बैठक झाली. त्यापुर्वी राज्य संचालक श्रीम. नरके व ई – प्रणालीतील तज्ञ अधिकारी यांचेसमवेत आंदोलनाबाबतच्या निवेदनातील सर्व विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या चर्चे दरम्यान त्यांनी मागण्या मान्य केल्या. जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे येथे झालेल्या बैठकिस अध्यक्ष सत्यवान गवस, उपाध्यक्ष सिंधुदु्र्ग दिलीप पाटील, उपाध्यक्ष रत्नागिरी संजय गांवकर, सरचिटणीस महादेव गवस, खजिनदार पिटर लोबो व कार्यकारणी पदाधिकारी, तलाठी श्री. गोडे व श्री उंडे उपस्थित होते.
ई – पिकपहाणी, ई – फेरफार, ई – चावडी, ई – हक्क इ. ई – प्रणालीमधील अडिअडचणी सोडवून शेतकरी व तलाठी संवर्ग यांना प्रणालीत काम करताना सुलभता यावी, यासाठी १६ ऑक्टोंबर २०२३ पासून दोन्ही जिल्ह्यातील सर्व तलाठी यांनी आपलेकडील अतिरिक्त कार्यभार असलेल्या तलाठी साझाच्या चाव्या त्या त्या तहसिल कार्यालयात जमा करुन आंदोलन सुरु केलेले आंदोलन मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे आज शेतकरी व तलाठी यांना ई – पिकपहाणी मध्ये काम करताना अडचणी येत असल्याने कायमपड/फळशेती या करीता कॉपी पेस्ट सुविधा पुरविण्याचे मान्य केले.
तसेच ई – फेरफारा मध्ये काम करताना दिवसा कार्यालयीन वेळेतही पुर्ण कार्यक्षमतेने जलदगतीने काम करता यावे या करीता दोन्ही जिल्ह्यासाठी सर्व्हर मध्ये स्वतंत्र स्पेस वाढविण्याचे मान्य केले. तसेच दोन्ही जिल्ह्या करीता स्वतंत्र सर्व्हर देणेचे मान्य केले. तसेच ई-फेरफार व ई – चावडी मध्ये काम करताना येणा-या अडचणींच्या अनुषंगाने सुधारणा करणे करीता शासन स्तरावर प्रस्ताव पाठवुन योग्य त्या सुधारणा केल्या जाणार असल्याचे मान्य केले. संघटनेच्या पदाधिकारी यांचे समवेत झालेल्या सर्व विषयांची चर्चा पुन्हा अप्पर जमाबंदी आयुक्त श्री. रायते साहेब यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय स्थायी समीतीच्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होऊन वरील सर्व विषया बाबत संघटनेला आश्वासीत केलेल्या विषयांबाबत समितीच्या बैठकीतही चर्चा होऊन मान्यता देण्यात आली असल्याचे सत्यवान गवस यांनी सांगितले.











