राजापूर (वार्ताहर): महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी आयोजित जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा सन २०२३-२४ नुकत्याच एस.व्ही. जे.सी. टी. क्रीडा संकुल, डेरवण येथे पार पडली. या स्पर्धेत बज्मे उर्दू अदब संचलित नॅशनल इंग्लिश स्कूल अॅन्ड ए. ई. कालसेकर ज्युनिअर कॉलेज, रानतळे, राजापूर या इंग्रजी माध्यम प्रशाळेतील 4 खेळाडूंनी जिल्हा स्तरावर प्रतिनिधित्व करत दोन सुवर्ण पदक व एक रौप्य पदक पटकावले.
यामध्ये कु. पूर्वा संदीप राऊत हिने 17 वर्षाखालील मुली या गटात सुवर्ण पदक पटकावले 17 वर्षे मुले गटात कु सुयोग सचिन कांबळे सहभागी झाला तर19 वर्षाखालील मुले या गटात कु.रोहित रमाकांत गार्डी सुवर्ण पदक व कु यश महेंद्र पाडावे यांनी रौप्य पदकाला गवसणी घातली. सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे व सहभागी खेळाडू यांचे संस्था अध्यक्ष असिफअली चौगुले, उपाध्यक्ष कमालुदीन मापारी, सचिव नुरुददीन काजी सर्व सदस्य पदाधिकारी तसेच प्राचार्या सबा दादन व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद व पालकवर्ग यांनी अभिनंदन केले. या खेळाडूना प्रशालेचे क्रीडा शिक्षक व तायक्वांदो अकॅडमी राजापूर चे प्रमुख प्रशिक्षक मुकेश शांताराम नाचरे हे मार्गदर्शन करत आहेत.












