महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगाव महाविद्यालयाच्या फॅशन डिजाईनींगच्या विद्यार्थिनींचा फॅशनशो संपन्न

रत्नागिरी : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, शिरगाव येथे नव्यानेच टेक्स्टाईल ॲन्ड फॅशन डिझायनिंग हा डिप्लोमा अभ्यासक्रम सुरु झाला आहे. नवरात्रीच्या निमित्ताने या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींनी फॅशनशो या कार्यक्रमाचे व दांडियाचे आयोजन केले होते. या फॅशन शो मध्ये १८ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.
या फॅशन शो ची थीम नवरात्रीनिमित्त गुजराती ड्रेस (घागरा) ही होती. विद्यार्थिनींनी स्वतः त्यांच्या कल्पनेप्रमाणे घागरा शिवून त्यावर पेंटिंग आणी एम्ब्रॉयडरी केली होती. व तेच कपडे परिधान करून फॅशन शो मध्ये सादर केले होते. या बरोबरच मूड बोर्ड व एम्ब्रॉयडरी सॅम्पल्स तयार करून डिसप्लेला ठेवले होते. या कार्यक्रमाला संस्थेच्या उपकार्याध्यक्षा व रत्नागिरी प्रकल्प स्थानीय समिती अध्यक्ष श्रीमती विद्याताई कुलकर्णी, प्रकल्प प्रमुख श्री. मंदार सावंतदेसाई, स्कुल ऑफ फॅशन टेक्नॉलोजी (SOFT) च्या माजी प्रचार्या व संस्था संचालक मंडळ सदस्य डॉ. मंजू हुंडेकर, प्रकल्प समन्वयक श्री. स्वप्नील सावंत, बीसीए कॉलेज प्रभारी प्राचार्या कु. स्नेहा कोतवडेकर आदीनी या कार्यक्रमाला भेट दिली व विद्यार्थिनींना प्रोत्साहन दिले.

या कार्यक्रमासाठी, विद्यार्थिनींना ड्रेसवर पेंन्ट कलर कॉम्बीनेशन कसे ठेवायचे त्यानंतर एम्ब्रॉडरी कशी करायची आणि तो ड्रेस कसा स्टिच करायचा याचे पूर्ण मार्गदर्शन कोर्स इंस्ट्रकटर सुरभी साखळकर व वृषाली नाचणकर यांनी केले. यावेळी झालेल्या फॅशनशो मधील सहभागी विद्यार्थिनीं मधून प्रोत्साहनपर ३ नंबर काढण्यात आले. यात प्रथम क्रमांक कु. मीरा सोहोनी, द्वितीय क्रमांक कु. तृप्ती पाष्टे आणि तृतीय क्रमांक श्रीमती. लता राउत या तिघींना देण्यात आले होते. बक्षिस वितरण, उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.