आशा व गटप्रवर्तक राज्यव्यापी संपाबाबत आरोग्य आयुक्त तथा अभियान संचालक धीरजकुमार यांच्याशी कृति समितीची चर्चा
लेखी निर्णय नसल्यामुळे संप सुरु राहणार
संतोष कुळे | चिपळूण : मुंबई येथे महाराष्ट्र राज्य आशा – गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती सोबत आरोग्य आयुक्त तथा अभियान संचालक धीरजकुमार यांनी आरोग्य भवन मुंबई येथे बैठक घेतली. या बैठकीत आशा व गट प्रवर्तक यांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली. मात्र लेखी निर्णय न झाल्याने समो सुरू राहणार आहे.
गट प्रवर्तकांना शासकीय कर्मचार्याचा दर्जा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कंत्राटी कर्मचार्याइतके वेतन देवुन इतर लाभ द्यावे. आशाना आँनलाईन कामाची सक्ती करु नये,. आशा व गटप्रवर्तकांना दिपावली बोनस द्यावे, गट प्रवर्तक नाव बदलून आशा सुपरवायझर हे नाव द्यावे, आशा व गटप्रवर्तकांना केंद्राकडुन मोबदल्यात वाढ मिळवुन द्यावी, डिलिव्हरी रजा द्यावी, सेवानिवृत्तीचे वय ठरवून दरमहा पेन्शन द्यावी, इत्यादी मागण्या बाबत चर्चा करण्यात आली .झाली.
आशांना ऑनलाईन कामाची सक्ती न करणेबाबत त्वरित सबंधिताना आदेश काढण्याचे आश्वासन यावेळी आयुक्तांनी दिले . दिवाळी बोनस देणे व गट प्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी दर्जा मिळणे बाबत प्रस्ताव तयार करणे या मागण्यावर सकारात्मक चर्चा झाली. मात्र सदर चर्चा चा लेखी निर्णय आरोग्य मंत्री यांच्या उपस्थितीत ३१ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत बैठक घेवुन करण्याचे आश्वासन मा.आयुक्त धीरजकुमार यांनी कृति समितीला दिले. सदर बैठकीत सहसंचालक (अतांत्रिक) सुभाष बोरकर, राज्य समन्वयक स्वाती पाटील हे सहभागी होते. कृति समितीच्या वतीने एम.ए.पाटील,राजु देसले,दत्ता देशमुख,आनंदी अवघडे,शंकर पुजारी,शुभा शमीम,आरमायटी इराणी,राजेश सिंह हे उपस्थीत होते.
या नंतर कृती समितीची बैठक झाली व पुढिल निर्णय घेण्यात आला.जो पर्यंत सर्व मागण्या मंजूर होत नाहीत,आणि शासनाकडुन लेखी मिळत नाही, तो पर्यंत संप सूरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी राज्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक भगिनिंना जाहिर आवाहन करण्यात येते की, कृति समितीने घेतलेल्या भुमिकेवर ठाम राहा. लढेंगे, जितेंगे, हम सब एक है। अशी घोषणा करण्यात आली.
एम.ए.पाटील, आनंदी अवघडे,
भगवान देशमुख, राजु देसले,
सुमन पुजारी, सुवर्णा कांबळे,
पुष्पा पाटील, रंजना गारोळे आणि सर्वांना आवाहन केले आहे.