रत्नागिरी : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मा. कुमार शेट्ये यांनी आज श्रीवर्धन येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. शरद पवारसाहेब यांची समक्ष भेट घेतली. प्रदेश उपाध्यक्ष झाल्यानंतर पक्षासाठी केलेले कामकाज, कार्यकर्त्यांशी साधलेला सुसंवाद, भेटी गाठी, सभा यांबाबत तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील पक्षाची सद्यस्थिती याबाबतचा पक्षाचा आढावा त्यांनी मा. शरद पवार यांचेपुढे सादर केला.यावेळी आर. डी. सी.सी बँकेचे संचालक रामभाऊ गराटे,माजी नगरसेवक बबन आंबेकर उपस्थीत होते.