राजापूर (वार्ताहर): महाराष्ट्र आणि पंजाब येथे भागवत धर्माची प्रचार पताका फडकवणारे विठ्ठल भक्त संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा ६७५ वा संजीवन समाधी सोहळा विठ्ठल मंदिर बाजारपेठ राजापूर येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन श्री संत नामदेव समाजोन्नती मंडळ राजापूर यांच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळी श्री संत नामदेव महाराज प्रतिमापूजन तसेच विठ्ठल रखुमाई यांचे पूजन समाजातील श्री. सौ. डॉ. राकेश सुनील खटावकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व महिलांचा ओटी भरणेचा पारंपारिक कार्यक्रम पार पडला. सायंकाळी सदिच्छा भजनी महिला मंडळ वरची पेठ यांचा भजनाचा कार्यक्रम पार पडला.
सायंकाळी समाजातील मुलांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरव करण्यात आला. चित्र रंगभरण स्पर्धा या स्पर्धेमध्ये लहान गटामध्ये सौम्या पंकज बावधनकर हिने प्रथम, शौर्य बावधनकर याने द्वितीय, दूर्वा खटावकर हिने तृतीय, जीत डंबे याने चौथा तर वैदिक कोळेकर याने पाचवा क्रमांक मिळवला. तसेच मोठ्या गटामध्ये दुर्वा संदेश आंबेकर हिने प्रथम, रिद्धी मंदार बावधनकर हिने द्वितीय, ह्रिद्धा ऋषिकेश कोळेकर हिने तृतीय क्रमांक मिळविला. लहान गटातील बक्षिसे ही अजय डंबे तसेच मोठ्या गटाची बक्षिसे अनिरुद्ध बावधनकर यांच्यातर्फे देण्यात आली.
याचप्रमाणे समाजातील ओमकार राजन डंबे याचा सीए उत्तीर्ण झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. ह्रिद्धा कोळेकर हिने इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परिक्षेत विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल समाजातर्फे सत्कार करण्यात आला. तसेच ओम आनंद कोळेकर याचा १०वी मध्ये विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्याबद्दल, सौम्या पंकज बावधनकर तिचा मंथन परीक्षेत राज्यामध्ये १४ वी आल्याबद्दल, मकरंद चंद्रशेखर बावधनकर १२ वी परिक्षा विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार करण्यात आले.
तसेच कै. सदानंद रामचंद्र कोळेकर यांचे स्मारणार्थ डॉ. आनंद सदानंद कोळेकर यांच्याकडून गेले अनेक वर्षे विशेष प्राविण्य मिळविलेल्या दहावी बारावी तील मुलांसाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. ही शिष्यवृत्ती यावर्षी सुयश प्रदीप कोळेकर याने दहावी मध्ये ९०% मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल समाजातर्फे याला देण्यात आली तसेच त्याचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी मंडळाची नवीन कार्यकारणी निवडण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदी अजय रमेश डंबे यांची मंदार प्रभाकर बावधनकर, राजेश मधुकर खटावकर यांची उपाध्यक्षपदी संदेश दत्तप्रसाद आंबेकर यांची सेक्रेटरीपदी निवड करण्यात आली. अनिरुद्ध मिलिंद बावधनकर सह सेक्रेटरी, डॉ. राजेश सुनील खटावकर खजिनदार, प्रथमेश सुनील डंबे, पंकज प्रभाकर बावधनकर, महेश रघुनाथ कुबडे, प्रणित प्रकाश कोळेकर, प्रसाद श्रीकृष्ण कोळेकर, ऋषिकेश श्रीकृष्ण कोळेकर, प्रसाद श्रीकांत आंबेकर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
मंडळाचे सल्लागार म्हणून सुरेश कोळेकर, श्रीकृष्ण कोळेकर, प्रभाकर बावधनकर, दत्तप्रसाद आंबेकर, मिलिंद बावधनकर, अरविंद खटावकर, विलास डंबे, प्रदीप कोळेकर, संतोष ढेकणे यांची निवड करण्यात आली. तसेच महिला कार्यकारणी सदस्य म्हणून सुवर्णा सुरेश कोळेकर, श्रद्धा श्रीकृष्ण कोळेकर, मानसी महेश कुबडे, नम्रता मंदार बावधनकर, तनिष्का अजय डंबे, मिलन मिलिंद बावधनकर, वंदना विलास डंबे, सायली संदेश आंबेकर यांची निवड करण्यात आली. तालुक्यामध्ये विभाग प्रमुख यांची नेमणूक करण्यात आली त्यांचे प्रमुख म्हणून श्रीकृष्ण कोळेकर यांची निवड करण्यात आली. तसेच विजय कोळेकर हातिवले, उपळे विभाग प्रमुख, सुरेश विठ्ठल मुळे कशेळी विभाग प्रमुख, भाई कुबडे नाटे विभाग प्रमुख, अरविंद दत्तात्रय खटावकर पाचल विभाग प्रमुख अशी निवड करण्यात आली.
फोटो 23 आरजेपी 2
राजापुरात संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६७५ वा संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात आला.












