संपर्क युनिक फाउंडेशन संस्थेला मिळाला स्वच्छता चॅम्पियन पुरस्कार

रत्नागिरी :  सामाजिक कार्य करणा-या संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी या संस्थेला सर्व क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल रत्नागिरी नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2023 व माझी वसुंधरा अभीयान 3.0 अंतर्गत केलेल्या कौतुकास्पद योगदानाबद्दल व कामगिरीबद्दल संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी ला प्रथम क्रमांक देवून स्वच्छता चॅम्पियन म्हणून सन्मानित करण्यात आले.रत्नागिरी नगर परिषदेच्या संत गाडगेबाबा महाराज सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान देण्यात आला.यावेळी हा सन्मान अध्यक्ष शकील गवाणकर, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष निलेश नार्वेकर ,कोऑर्डिनेटर सौ निकीता कांबळे यांनी स्विकारला.
नगर परिषदेचे प्रशासक चाळके साहेब,माजी आरोग्य सभापती निमेश नायर तसेच इतर मान्यवरांचे हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.यावेळी संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे अध्यक्ष शकील गवाणकर यांनी आमच्या संस्थेचे कार्य हे गेली पाच वर्षे सातत्याने सुरू असून वैद्यकीय,क्रीडा,आरोग्य, स्वच्छता,दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला व बालक तसेच गोरगरीब जनतेसाठी आम्ही सतत काम करीत आहोत,हे कार्य एकट्याचे नसून आमच्या संस्थेच्या सर्व सभासदांनी केलेल्या मौलिक सहकार्यामुळे होत असल्याचे प्रतिपादन केले,याही पुढे आमचे हे काम असेच सुरू राहील, आमच्या या कार्याची दखल रत्नागिरी नगर परिषदेने घेवून आमचा जो सन्मान केला त्या बद्दल धन्यवाद दिले.भविष्यात संस्थेला खूप काम करावयाचे असून नागरिकांनी या संस्थेला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी शकील गवाणकर यांनी केले.