सावंतवाडी । प्रतिनिधी :दिपावलीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी तालुका काँग्रेस व युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ११ नोव्हेंबर रोजी खुल्या नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी भव्य व आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली असून खुल्या गटासाठी रुपये ११ हजार १११ तर बाल गटासाठी ५ हजार ५५५ रुपये अशी बक्षीसे देण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी आणि युवक शहराध्यक्ष नईम मेमन यांनी दिली.
यावेळी शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर तालुका सरचिटणीस हिदायतुल्ला खान, अंझला नाईक कृपेश राठोड, अमित सावंत, रोहीत गावडे, आवेझ खान आदी उपस्थित होते.
ही स्पर्धा ११ नोव्हेंबर रोजी रात्री साडे आठ वाजता येथील श्रीराम वाचन मंदिर समोर मोती तलावाच्या काठावर होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक अकरा हजार एकशे अकरा द्वितीय पारितोषिक ७ हजार ७७७ तर तृतीय पारितोषिक ५ हजार ५५५ असे ठेवण्यात आले आहे.
तर बालगटासाठी प्रथम पारितोषिक ५ हजार ५५५ द्वितीय पारितोषिक २ हजार २२२ तर उत्तेजनार्थ म्हणून लहान मुलांच्या तीन गटांना १ हजार १११ रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. या स्पर्धेचे औचित्य साधून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सेवा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी भाग घेवू इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावे देवेंद्र टेमकर ९४०३०४४०१९, कृपेश राठोड ७७६०२०८०१४, अंझला नाईक ७२४८७७०८३८ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच या स्पर्धेसाठी जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी व राष्ट्रवादी युवक राष्ट्रवादी अध्यक्ष नईम मेमन यांच्यावतीने करण्यात येत आहे.