गोवर आजारावर प्रतिबंधासाठी विशेष लसीकरण मोहीम

Google search engine
Google search engine

तालुका आरोग्य अधिकारी डॉ जांगिड यांची माहिती

गुहागर | प्रतिनिधी : गोवर आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विशेष लसीकरण मोहिमेंतर्गत लहान मुलांसाठी गोवर रुबेला लसीकरणाची दुसरी फेरी १५ ते २५ जानेवारी या कालावधीत राबविण्यात येणार आहे. कार्यक्षेत्रात गोवर आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. गोवर रुबेला लस न घेतलेल्या जास्तीत जास्त बालकांचे लसीकरण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार, तालुक्यातील ९ महिने ते ५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना गोवर रुबेला लसीकरण करण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात ही लसीकरण मोहीम सुरू केली असल्याची माहिती तालुका आरोग्यअधिकारी डॉ घनश्याम जांगिड यांनी दिली.

यामध्ये दि १५ ते २५ जानेवारी या कालावधीत संपूर्ण तालुक्यात लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून यामध्ये ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना गोवर रुबेला लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे.
– ज्या बालकांनी या लसीचा डोस घेतला नाही, त्यांना पालकांनी नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत घेण्यात येणाऱ्या बाह्य लसीकरण सत्रामध्ये जाऊन लसींचा डोस द्यावा असे आवाहन
तालुका आरोग्य अधिकारीपंचायत समिती गुहागर यांच्यावतीने करण्यात आले आहे.