खेड(प्रतिनिधी)आज वरच्या शिक्षकी सेवेच्या प्रवासात विद्यादानाचे पवित्र कार्य करणारे शरद भोसले हे रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीची पंचवार्षिक निवडणूक लढवत असून त्यांना शिक्षक मतदार वर्गातून वाढता पाठिंबा मिळत असून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे एकमताने या तरुण आश्वासक नेतृत्व निवडून येतील असा आशावाद व्यक्त होत आहे
शरद भोसले याच्यासारख्या शिक्षकांच्या प्रश्नासाठी सतत धडपडणाऱ्या कार्यकर्त्याला संघटनेचे बळ मिळाले होते संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवले तालुका शिक्षण विभागाशी संपर्क साधून शिक्षकांचे अनेक कामे तत्परतेने करून घेतली शरद भोसले यांच्या रूपात एक युवा नेतृत्व खेड तालुक्यात उभारी घेत आहे मात्र शरद भोसले यांच्या या नेतृत्व गुणाला खरी झळाळी आली ती त्यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती या आक्रमक अशा संघटनेत प्रवेश केल्या नंतरच.
धामणंदपासून आंबवली वडगाव पर्यंत तर होडखाड कर्जीपासून मांडवे रसाळ गड पर्यंत प्रत्येक शाळांमध्ये शरद भोसले पोहोचले शिक्षकांच्या अनेक समस्या त्यांनी समजावून घेतल्या शिक्षक समितीच्या माध्यमातून शिक्षकांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली तळागाळातील शिक्षकांमध्ये मिसळणारा कार्यालयावर जबर वचक असणारा शिक्षकांचे प्रश्न चुटकीसरशी सोडवणारा आक्रमक स्वभावाचा हा अध्यक्ष खेड तालुक्यातील प्रत्येक शिक्षकाला भावला आहे
कोरोना काळात महिला शिक्षक भगिनींना कोरोनाची ड्युटी लागू नये त्याचप्रमाणे शिक्षक बंधूंना लावलेली पोलीस मित्र ही ड्युटी समन्वय समितीच्या माध्यमातून रद्द करायला लावून शरद भोसले यांनी शिक्षकांना न्याय मिळवून दिला होता शिक्षकाचे कोणतेही काम असो ती शरद भोसले नक्कीच करणार असा विश्वास शिक्षकांमध्ये निर्माण झाला
या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये असलेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती अखिल भारतीय शिक्षक संघ पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना उर्दू शिक्षक संघटना शिक्षक सेना मंडणगड तालुका कास्ट्राईब संघटना या सर्व संघटनांचे मिळून खेड तालुका उमेदवार म्हणून शरद शहाजी भोसले हे आहेत शरद भोसले यांनी ज्यावेळेस उमेदवारीचा अर्ज भरला त्याचवेळी त्यांचा विजय निश्चित झालेला आहे असे मानले जात आहे महायुतीमध्ये असलेल्या सर्व संघटनांची साथ कार्यकर्त्यांची भली मोठी फौज महिला शिक्षक भगिनींचा भरघोस पाठिंबा या सर्वांच्या बळावर शरद शहाजी भोसले हे खेड तालुक्यातील विक्रमी मतांनी विजयी होतील असा विश्वास खेड तालुक्यातील प्रत्येक शिक्षक सभासद व्यक्त करत आहे











