खेड(प्रतिनिधी) कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई तालुका शाखा खेड, मुंबई संलग्न कुणबी युवा खेड तालुका युवा कार्यकारीणी २०२३-२०२८ निवडीबाबतची जाहीर सर्वसाधारण सभा शनिवार .१७ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ४.०० वाजता दि शिक्षण प्रसारक, मुलुंड विद्यामंदिर, २रा माळा, रूम नं २०५, नेहरू रोड, मुलुंड (पश्चिम) मुंबई ४०० ०८०* या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे.
ही कार्यकारीणी निवड सभा .युवाध्यक्ष मंगेश मांडवकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे. सदर सभेसाठी खेड तालुक्यातील कुणबी समाजोन्नती संघ मुंबई च्या सभासदांनी व तालुक्यातील सर्व कुणबी समाज बांधव , समाजातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शासकीय अधिकारी/कर्मचारी व सर्व कुणबी समाज बांधव यांनी या महत्त्वाच्या सभेस उपस्थित रहावे.असे अहवान युवासचिव प्रविण शिबे यांनी केले आहे.










