लांजा( प्रतिनिधी )लांजा येथे पार पडलेल्या फॅन्सी दांडिया स्पर्धेत डी.जे सामंत इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले आहे.
फ्रेंड सर्कल लांजाच्या वतीने या फॅन्सी दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डी.जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूलने भरघोस यश संपादन केले. यामध्ये उत्कृष्ट जोडी म्हणून आरुष कुमावत व स्वर कामत, विशेष आकर्षण म्हणून शिवन्या कदम आणि सादिया काझी, उत्तम सादरीकरणासाठी अयांश राजेशिर्के आणि कुंजल बाणे, बेस्ट आऊटलुक साठी निल लांजेकर आणि तीर्था यादव तर उत्कृष्ट वेशभूषा साठी स्वरा सावंत आणि परी सावंत या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
यासाठी या विद्यार्थ्यांना डी.जे सामंत इंग्लिश मीडियम स्कूलचे शिक्षकवृंद ,मुख्याध्यापक, पालक आणि संस्थाचालक यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.