रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी हद्दीत समुद्र किनाऱ्यापासून आठ ते दहा वावात घुसखोरी करून मासेमारी करताना पकडलेल्या कर्नाटकातील हायस्पीड ट्रॉलरला रत्नागिरीच्या मत्स्य विभागाने मासळी किमतीच्या पाच पट दंड आकारला आहे.
१० नोव्हेंबरला रात्री गस्त घालताना गस्ती पथकाला श्री नित्यानंद नावाच्या नौकेला पकडण्यात यश आले. त्यावर सात खलाशी आणि एक तांडेल आहे. ती नौका मिरकरवाडा बंदरात आणून स्थानबद्ध केली . त्यावर २ लाख ६१ हजार रुपयांची मासळी होती. त्यांच्याविरोधात सहाय्यक मत्स्य आयुक्तांकडे सुनावणी घेण्यात आली. नौकेवर मिळालेल्या मासळीच्या ५ पट दंडासह जाळ्यांचा लहान आकारासाठी मिळून त्या नौका मालकाला १६ लाख १० हजार रुपयांचा दंड आकारला आहे.