मंडणगड l प्रतिनिधी : मंडणगड नगरपंचायत स्वच्छ सर्वेक्षण २०२३ माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शहरातील निवळी नदी येथे नदीवर अंगमेहणतीने नगरपंचायतीने बंधारा बांधून शहराला दरवर्षी पाणी प्रश्न भेडसावणारा या पुढील वर्षी सुद्धा जास्त प्रमाणात पाणी प्रश्न भेडसावणार असल्याने म्हणून नगरपंचायतीने आत्ता पासूनच नदीवर बंधारा बांधण्यासाठी नगरपंचायतीने कंबर कसली आहे. यावेळी नगरसेवक व नगरपंचायतीचे कर्मचारी यांनी खेळीमेळीच्या वातावरणात व अंगमेहणतीने बंधारा बांधण्यात सुरूवात केली आहे. यावेळी नगराध्यक्षा सौ. सोनल बेर्डे, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे , पाणी पुरवठा सभापती सुभाष सापटे व सर्व नगरसेवक, कर्मचारी मनोज मर्चंडे, विकास साळवी, सुरज कदम, रोशन बेलोसे, स्वच्छता कर्मचारी, तसेच पाणी कमिटीचे कर्मचारी आदींनी मेहनत घेतली.











