शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. आपत्तीमध्ये, देशाच्या उत्तर-पश्चिम जिल्ह्यांमध्ये भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला. इमारती कोसळल्याने आणि दळणवळणाचे दुवे तुटल्याने परिस्थिती बिकट झाली आहे.
वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम नेपाळमध्ये 128 लोकांचा मृत्यू झाला आणि 140 हून अधिक लोक जखमी झाले. इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक दबले गेल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. नेपाळशिवाय भारतातही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. दिल्ली-एनसीआरसह यूपी आणि बिहारमध्ये मध्यरात्री लोक घाबरून घराबाहेर पडले.
Home ताज्या घडामोडी नेपाळमध्ये भूकंपामुळे 128 जणांचा मृत्यू, 140 हून अधिक जखमी; भारतातही जाणवले जोरदार...












