खेडमधील बोरघर, दस्तुरी, कोतवलीत गावठी दारू धंद्यावर धाडी तिघांवर गुन्हा

crime
खेड(प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील बोरघर दस्तुरी व कोतवली या तीन ठिकाणी येथील पोलिसांनी टाकलेल्या  धाडीत मुद्देमालासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोरघर भंडारवाडी येथे टाकलेल्या धाडीत अविनाश यशवंत मयेकर राहणार बोरघर  भांडारवाडी याच्याकडून १३०० रुपये किमतीची हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली दस्तुरी येथे टाकलेल्या धाडीत बबन वसंत पवार राहणार चिंचघर दस्तुरी याच्याकडून ९०० रुपयाची गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आली तर २८ मे रोजी कोतवली टेप भोईवाडी येथे  टाकलेल्या धाडीत कुमार अनंत जुळे याच्याकडून ३४००  रुपये किमतीची गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आली