रत्नागिरी : प्रतिनिधी : शहराजवळील नाचणे येथील तरुणाने अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. हि घटना शुक्रवार 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 ते 5.15 वा. कालावधीत घडली आहे.
रुपेश रवींद्र नेवरेकर (38,रा.गणेश कॉलनी नाचणे, रत्नागिरी ) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.शुक्रवारी सायंकाळी रुपेशने अज्ञात कारणातून राहत्या घरी त्याच्या रूममधील सिलिंग फॅनला रस्सीने गळफास घेतला. हि बाब त्याच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने शहर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.








