खेड (प्रतिनिधी) रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हद्दीतील ओंबळी- बौद्धवाडी रस्त्यावर गस्त घालत असताना विनापरवाना लाकडांची वाहतूक करणाऱ्या ९ जणांना पोलादपूर वनविभागाने ताब्यात घेतले. ट्रॅक्टरसह जेसीबीही जप्त केला आहे.
पोलादपूर तालुक्यातील ओंबळी- बौद्धवाडी येथील रस्त्यावर वनाधिकारी राकेश साहू व पथक गस्त घालत असताना दोन ट्रॅक्टरमधून ओब्याचे भले मोठे लाकूड व सागाची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले.
दोन्ही ट्रॅक्टर अडवून वाहतूक करणाऱ्यांकडे कागदपत्रांची विचारणा करण्यात आली असता ती
आढळली नाहीत. यामुळे विनापरवाना वाहतूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी ९ जणांना ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या ९ जणांकडून दोन ट्रॅक्टर, एक जेसीबी, एक दुचाकी तसेच आंब्याची २ लाकडे व साग असा ऐवज जप्त केला. ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे समजू शकली नाहीत.









