विद्यार्थ्यांनी फक्त पैसाच सर्व काही न मानता जे काही उत्तुंग कराल ते समर्पन भावनेने करा- मोहन जोशी

Google search engine
Google search engine

चतुरंगचा सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले गुणगौरव पुरस्कार सोहोळा

चिपळूण | प्रतिनिधी : एक व्यक्ती ज्ञानाने समृध्द होतो. तो समृध्द झालाच तर त्याच्या कुटुंबासह समाज, राष्ट्रही समृध्द होते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी फक्त पैसाच सर्वकाही न मानता जे काही उत्तुंग कराल ते समर्पन भावनेने करा. यातूनच यश निश्चित मिळेल. मात्र याबरोरबरच राष्ट्रालाही समृध्द बनवा, असे मत ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांनी व्यक्त केले. शहरातील युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरुदक्षिणा सभागृहात रविवारी चतुरंगचा सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आदर्श व्यक्तिमत्वासह आदर्श व्यक्तींचे चरित्र विद्यार्थ्यापर्यंत पोहचली पाहिजेत. यातूनच ते विद्यार्थी खऱयाअर्थाने त्यापमाणे घडतील. आज वाचन संपले असून सर्वच गुगलवर अवलंबून आहेत. मात्र त्यावर अलंबून न राहता ज्ञानाकरिता पुस्तके वाचली पाहिजेत. यासाठी आयुष्यात वाचाल तरच वाचाल. विद्यार्थी हा राष्ट्र असून तुम्हीच राष्ट्राचे भले करणार आहात. ज्यावेळेस मूल्याधिष्ठीत शिक्षण सुरु झाले तेव्हापासून मूल्य संपुष्टात येवू लागले. मनाने आणि समर्पन भावनेने काम केले तर यश मिळतेच; शिवाय पैसाही मिळतोच. पैशातून केवळ स्वत:चे कल्याण न बघता समाजासाठी काय करता येईल यासाठी विचार करा हा माझा अनुभव आहे. मी सामन्य कुटुंबातील असून माझे वडील कीर्तनकार त्यामुळे चित्रपटसृष्टीचा काहीही संबंध नव्हता. मात्र हळूहळू या क्षेत्रात जाऊन आज 35 वर्षे काम करत आहे. त्यात पतिष्ठाही मिळवली.

सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले या पुरस्कारासाठी 200 विद्यार्थ्यांमधून 29 विद्यार्थी स्विकारले म्हणजे ही स्पर्धा नव्हे. त्या विद्यार्थ्यांमध्ये कोणता स्पार्प, त्याची चतुराई, त्यास काय दिले तर काय होईल यासाठी उत्तम परीक्षा घेतली गेली. हे काम पूर्वी संतांनी केले आहे. त्यांच्या स्वप्नातील भारत म्हणजे हा पुरस्कार पाप्त विद्यार्थी आहेत. हा पुरस्कार म्हणजे शिक्षणाचा दुसरा टप्पा आहे. फुलपाखरु बनण्यापूर्वी तो एक किडा असतो. त्याच्या कायम ध्यान्यात असते की मला फुलपाखरु व्हायचे आहे. अशी फुलपाखरे व्हा की समाजासह राष्ट्रालाही आधार बना. अपयशाशी सामना कसा करावा हे अब्दुल कलाम यांच्या चरित्रातून दिसते. जीवनात उत्तुंग करण्यासाठी बघितलेले स्वप्न दाबून न ठेवता ते सत्यात उतरण्याचे पयत्न करा. त्याला कष्टाची जोड द्या व यातूनच यश मिळवा असे जोशी म्हणाले.
यावेळी डॉ. पसाद देवधर, शरयू यशवंतराव, राजेंद्र वारे यांनीही मार्गदर्शन केले. आभार स्नेहल जोशी यांनी मानले.