चिपळूण | प्रतिनिधी : कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे अध्यापक महाविद्यालय मांडकी – पालवण येथे प्रथम वर्ष प्रवेशित छात्राअध्यापकांचा स्वागत समारंभ दि. ०८.०१.२०२३ रोजी उत्साहात संपन्न झाला . यावेळी व्यासपीठावर संस्थेचे संचालक मा. सुरेशजी खापले, मा. प्राचार्य डॉ. संकेत कदम,सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. तसेच प्रथम वर्षातील प्रवेशित सर्व छात्र अध्यापक ही उत्साहाने उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यकमाची सुरूवात झाली प्राध्यापिका सौ. कोल्हापूरे सुनिता यांनी महाविद्यालयाची स्थापनेपासूनची वाटचाल सांगितली तसेच बी.एड चा बदललेला अभ्यासक्रम व मूल्यमापन यांची माहिती दिली . •. मा. प्राचार्य डॉ संकेत कदम यांनी आपल्या भाषणात बी. एड प्रशिक्षण ख-या अर्थाने किती महत्त्वाचे आहे ते सांगितले. तसेच संस्थेची शिस्त व विकास याची ही माहिती दिली अध्यक्षस्थानावरून बोलताना मा. सुरेशजी खापले यांनी सभापती असताना शिक्षकांचे व शिक्षणक्षेत्रातले आलेले अनुभव सांगितले. तसेच एक शिक्षकच पिढी घडवत असतो. म्हणून व्यवस्थित नसलेल्या गोष्टी सुदधा शिक्षकांनी चांगला नागरीक घडविण्यासाठी स्वता:हून अंमलात आणाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.
नवीन प्रवेशित छात्रा अध्यापकांनी आपला परिचय करून दिला. त्यांना गुलाब पूष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सृष्टी कदम यांनी केले. • तर आभार प्रा सौ. जान्हावी कांबळे यांनी मानले.