कै. अपीशेठ गवाणकर यांच्या स्मरणार्थ मतिमंद विद्यालयाला मदतीचा हात

विशेष दिव्यांग मुलांना वाटल्या थंडीत उपयोगी येणाऱ्या वस्तू

कणकवली | प्रतिनिधी : कणकवली येथील कै. अपीशेठ गवाणकर यांच्या स्मरणार्थ मतिमंद (दिव्यांग)मुलांची शाळा करंजे तालुका कणकवली येथे सर्व मुलांना थंडी पासून संरक्षण व्हावे म्हणून कान टोप्या आणि खावू वाटप करण्यात आले. तर शाळेसाठी एक कपाट, आग लागण्या सारखी दुर्घटना घडली तर आग विजवण्याच यंत्र यावेळी देण्यात आहे.
कणकवली तालुक्यात अपीशेठ गवाणकर हे दानशूर व्यक्तिमत्व म्हणून सर्वश्रुत होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाने त्यांचा हा वारसा पुढे चालू ठेवला आहे. श्रद्धांजलीच्या निमित्ताने विविध क्षेत्रात दानाच्या रूपाने गवाणकर कुटुंबाने मदत केली. विशेष दिव्यांग मुलांना मदत दिली.यावेळी हर्षल उर्फ राजू गवाणकर,गौरव गवाणकर, सौ. हर्षदा गवाणकर, सौ. रूपाली कामत, सौ. शिल्पा सामंत,दिनकर उर्फ महेश कामत, देवव्रत सामंत ,डॉ.सायली कामत, दानीश गवाणकर उर्वी गवाणकर,साहील, सायली, देवांश यांच्या सह संतोष महाजन,दीपक नाईक आदी गवाणकर परिवारातील सदस्य उपस्थित होते.