आडाळीत पाण्यात बुडून इसमाचा मृत्यू

दोडामार्ग (प्रतिनिधी) :     आडाळी ख्रिश्चनवाडी येथील जॉर्ज सायर फर्नांडिस (५२) हे चालत जात असताना तोल जाऊन देवाच्या तळीच्या पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी ९.५० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद मेलविन फ्रान्सिस फर्नांडिस यांनी दोडामार्ग पोलीस स्थानकात दिली. पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.