भाजपासोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरेंची तडफड | आमदार नितेश राणेंचा हल्लाबोल

सुशांत सिंग राजपूत, दिशा सालीयन केसला वेगळं वळण ; आदित्य ठाकरेना अटक होणार असल्याची शक्यता

कणकवली : सुशांतसिंग राजपूत आणि दिशा सालीयान केसला महत्त्वाचं वळण लागलेल आहे. उद्धव ठाकरे यांना भारतीय जनता पक्षाबरोबर युती करायची असल्यामुळे जिकडे – तिकडे लाळ टाकत ते सध्या फिरत आहेत. दिल्लीमध्ये कोण भेटत आहे काय, हे बघत आहेत. संजय राऊत कितीही बोलुंदे पण उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य परत भारतीय जनता पक्षाने विना शर्त आम्हाला सोबत घ्याव यासाठी तडफडत आहे. याच मुख्य कारण म्हणजे दिशा सालीयान आणि सुशांतसिंग राजपूतची केस, ज्या दिशेने चालली आहे, त्यामध्ये आदित्य ठाकरेला अटक होणारच, अशी शक्यता निर्माण झाली आहे. म्हणूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांवर पन्नास खोक्यांचा जो आरोप करत आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र आणि देशाला उत्तर द्यावं की जे वकील आणि जे तक्रारदार सुशांतसिंग राजपूतच्या विषयात कोर्टात गेले त्यांना केस मागे घेण्यासाठी ५० कोटींची ऑफर उद्धव ठाकरे यांनी दिली आहे की नाही ? याचं उत्तर त्यांनी महाराष्ट्राला द्यावं, असा इशारा देखील आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. तसेच तुमच्या मुलाचा या केस मध्ये काही संबंध नसेल तर त्या केस संबंधित वकील व त्या लोकांना पन्नास कोटींची ऑफर का करता ? दुसऱ्यांना पन्नास खोके, पन्नास खोके म्हणून डिवचायचं आणि स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी पन्नास खोके घेऊन फिरायचं. यावर उद्धव ठाकरे यांनी उत्तर द्यावं, अशी मागणी ही आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

पुढे बोलताना आ. नितेश राणे म्हणाले, आमच्याजवळ असलेल्या माहितीनुसार उबाठाला दहाच्या वर सीट देणार नाही. पुढे कळेलच. घ्यायचं तर घ्या नाहीतर बाजूला व्हा! आणि इंडिया अलायन्सची जी अवस्था आज आहे ती अवस्था आणि जशी परिस्थिती होऊन राहिली आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदींसारख्या बलाढ्य, ताकदवानाला लढण्यासाठी बोंबाबोंब करत आहेत. आणि भांडुपचा देवानंद बोलतो की, २०२४ ला नरेंद्र मोदींच सरकार जाणार आणि इंडिया अलायन्सचं सरकार येणार. याला उत्तर देत आमदार नितेश राणे म्हणाले की, २०२४ पर्यंत तुम्ही एका नाड्याने इंडियाचे अलायन्सचे पक्ष बांधून तरी ठेवा. काँग्रेस पक्षाला तुमच्याच अलायन्सचा पार्टनर जर फ्रॉड पक्ष म्हणत असेल तर या फळ लोकांच्या हातात भारताला द्यायचं का ? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या सक्षम आणि ताकदवान नेत्याच्या हाती २०२४ ला सत्ता देण्यासाठी भारताचा नागरिक सज्ज आहे. म्हणून हे कितीही ओरडत बसले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा २०२४ ला भारताचे पंतप्रधान होणार आहेत.

तसेच जशी दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तसाच दिवाळी बोनससाठी मालकाला खुश ठेवण्याच्या उद्दीष्टाने संजय राजाराम राऊत दिसून आला. तसेच त्याचा नवीन मालक जो दहा जनपथला बसतो त्याची चाटुगिरी करत असताना दिसला. दिवाळीचा बोनस मातोश्रीवर मिळेल, सिल्वर ओक ला मिळेल की, दहा जनपथला मिळेल म्हणून लाळ टाकत असताना इंडिया अलायन्स कशी टिकणार आहे. काँग्रेस पाचही राज्यांमध्ये कशी जिंकणार आहे. यावर वायफळ गोष्टी करत असताना सकाळी दिसून आला. अमित शहा यांनी प्रचारावेळी सांगितले होते की, इंडिया अलायन्स हा एक भारतामध्ये सर्वात मोठा झालेला २०२४ च्या निमित्ताने घोटाळा आहे. ही अलायन्स २०२४ पर्यंत टिकणार नाही. हे ॲफिडेविटवर देखील लिहून द्यायला आम्ही तयार आहोत. कारण एका बाजूला नितीशकुमार हे काँग्रेसला नाव ठेवत आहे तर दुसरीकडे अखीलेश यादव मध्यप्रदेशच्या प्रचाराच्या निमित्ताने काँग्रेस पक्ष हा फ्रॉड पक्ष आहे म्हणून सांगत आहेत. इंडिया अलायन्सचा एक महत्त्वाचा घटक असं तो पक्षाच्या प्रमुख अखिलेश यादव म्हणतो की, काँग्रेस पक्ष फ्रॉड आहे. महाराष्ट्रमध्ये उबाठा सेना जो उद्धव ठाकरे यांचा पाळलेला डॉबरमॅन आहे. जो चिपळूणवरून भुंकत असतो. त्याने चिपळूणमध्ये बसून सीटच वाटप करून टाकला आहे की, २०१९ ला आम्ही एवढ्या एवढ्या जागा जिंकलो, राष्ट्रवादी पक्ष एवढी जागा जिंकली, वगैरे! म्हणजे गल्लीत बसून दिल्लीचे निर्णय घ्यायचे, हे उबाठा व उद्धव ठाकरे यांचा डॉबरमॅन चिपळूण मध्ये बसून भू – भू करत आहे.