रत्नागिरी | प्रतिनिधी : कोणपण येतय,जंगल तोडतय या धर्तीवर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अवैध्य जंगल तोड होत आहे. रोज अंबा घाटाच्या दिशेने अनेक ट्रक लाकडे भरून जाताना जनतेला जाताना दिसत आहे. अश्या गोष्टी राजरोस पण दिसत असून वन (फॉरेस्ट) अधिकारी व प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत. असा आरोप काँग्रेसतर्फे कपिल नागवेकर यांनी केला आहे.
त्यामुळे जंगलातील माकड , वानर,डुक्कर व प्राणघातक बिबट्या यांचा वावर शहरी व ग्रामीण भागात वाढला आहे. त्या कारणाने चिकू, केळी, काजू व अंबा शेतकरी यांचे अतोनात नुकसान होत आहे. तरी संबंधित अवेध्य लाकूड व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीवर तात्काळ कारवाई करावी अन्यथा प्रशासन व वन अधिकारी विरोधात आंदोलन छेडण्यात येईल अश्या आशयाचे निवेदन वन अधिकारी पाटील साहेब यांच्याकडे देण्यात आले. तदप्रसंगि ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष दीपक राऊत, प्रदेश सचिव सुस्मिता सुर्वे, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन मालवणकर, तालुका सरचिटणीस काका तोडणकर,अंबा व्यापारी प्रमोद सक्रे, सुबोध कुंटे, दर्शन सक्रे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते












